spot_img
spot_img
spot_img
spot_img

5 हजारांची भीक नको, हेक्टरी एक लाख द्या’; रविकांत तुपकरांचा मलकापुरातून सरकारला एल्गार!

शहीद जवानाच्या वीरपत्नीच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत दुष्काळ संघर्ष यात्रेला प्रारंभ; ४ डिसेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चा, मागण्या मान्य न झाल्यास नागपूर अधिवेशनात संघर्षाचा इशारा

मलकापूर (प्रतिनिधी) “शेतकरी आणि सैनिक आहेत म्हणून देश जिवंत आहे. मात्र, आज शेतकरी संकटात असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. पाच हजार रुपयांच्या मदतीने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या, अन्यथा संघर्ष अटळ आहे. सरकारच्या नरडीवर पाय ठेवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ,” असा आक्रमक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली १४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या दुष्काळ संघर्ष यात्रेचा दिमाखदार प्रारंभ झाला.पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर त्यांच्या वीरपत्नी सुषमाताई राजपूत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी शहीद जवानांचे पुत्र जय आणि शुभम राजपूत, माजी सैनिक, शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी नांगराचे पूजनही करण्यात आले.यात्रेच्या प्रारंभी रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथील निवासस्थानी आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी औक्षण केल्यानंतर ‘लोकरथा’चे पूजन करून ते मलकापूरकडे रवाना झाले.सभेत बोलताना तुपकरांनी सरकारच्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजूर आणि भूमिहीनांना प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली. सोयाबीनला प्रतिक्विंटल १२ हजार आणि कापसाला १७ हजार रुपये भाव द्यावा, कापसावरील आयात शुल्क ३० टक्के करावे, सोयापेंड आयात थांबवून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.याशिवाय सरसकट कर्जमाफी, खासगी फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसुली थांबविणे, शेतकऱ्यांना २४ तास वीज, जनावरांसाठी थेट शेतकऱ्यांच्या दावणीला चारा, प्रलंबित पीकविमा आणि महिला बचतगटांचे कर्ज माफ करण्याची मागणी त्यांनी केली.

४ डिसेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चा दुष्काळ संघर्ष यात्रेदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांना संघटित करण्यात येणार आहे. पुढील २१ दिवस लोकरथ जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतील गावांमध्ये जाऊन जनजागृती करणार आहे. ४ डिसेंबर रोजी बुलढाणा येथे एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे तुपकरांनी जाहीर केले.

“नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर नागपूरचे अधिवेशन कसे होते ते पाहू,” असा थेट इशाराही त्यांनी सरकारला दिला. या यात्रेमुळे जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाला नव्याने दिशा मिळण्याची चिन्हे आहेत.

spot_img

Related Articles

“मंत्रालय तुमच्या बापाचं नाही, आमच्या शेतकऱ्यांच्या पैशावर चालतं!” रविकांत तुपक

मंत्रालय तुमच्या बापाचं नाही, आमच्या शेतकऱ्यांच्या पैशावर चालतं!” रविकांत तुपकरांनी भरसभेत सांगितला मंत्रालयातील किस्सा; “राज्यातल्या नंबर दोनच्या मंत्र्याने मला फोन करून माफी मागितली!” सामान्य...

IPL नंतर वैभव सूर्यवंशीची विस्फोटक खेळी! चौकार | षटकारांचा पाडला पाऊस

IPL 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. १३ वर्षीय वैभववर राजस्थान रॉयल्सने १.१० कोटींची बोली लावली. पहिल्याच हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली. या...
spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!